Phone
+91 9422073551Address
Kasturi Niwas, Chatrapati Sambhaji Nagar, Murabad, Maharashtra 421401© Alrights reserved
by MLA Shri Kisan Kathore
बारवी धरणाचे विस्तारीकरणाचे कामप पूर्ण झाल्यानंतर आता या वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यात प्रक्रिया झालेल्या पाण्याचे वितरण करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला: असून त्याची निविदा देखील काढण्यात आली आहे. एमआयडीसीची जुन्या जलशुद्धीकरण यंत्रणेला पर्याय म्हणून बदलापूर जवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मोठा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तब्बल ५२० कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नव्याने पंप हाऊस उभारले जाणार आहे. यासोबतच १२५ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारले जाणार आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात सर्व रस्ते काँक्रीट करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. ज्या भागातून एमआयडीसीच्या जलवाहिनी जात आहेत त्या भागातील जांभूळ आणि वसत गाव परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.
बदलापूर वाढीव योजनेतील कामे
उल्हास नदी किनारी वालिवली येथे जॅकवेल.
खरवई आणि बेलवली येथे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम विभागासाठी जल शुद्धीकरण केंद्र (खस्वई केंद्र क्षमता-५४ दशलक्ष लिटर, बेलवली केंद्र क्षमता- ६० दशलक्ष लिटर)
बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागात सुरळीत पाणी वितरणासाठी १४ जलकुंभ अद्ययावत पंपिंग मशिन्स, वितरण यंत्रणा.
२०५६ मधील बदलापूरच्या अंदाजित ७ लाख ६२ हजार लोकसंख्येला पुरेशा पाणी पुरवठ्याची योजनेत तरतूद प्रतिदिन दरडोई- १३५ लिटर पाणी पुरवठा वाढीव योजनेतील आमराई, मानकिवली, कार्मेल, किर्ती पोलीस लाईन या १८ कोटींची जलकुंभांची कामे सुरू झाली आहेत.
Website and App developed by WE-cts
© 2024 | All rights reserved by Shri. Kisan Kathore