VIKASPARV 5.0

Menu
Logo

सामाजिक भान आणि संवेदनशीलता - मुरबाडमध्ये समाजस्नेही उपक्रमांचे 'स्पंदन'

अंबरनाथ येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी यांचे स्पंदन फाऊंडेशन २००९ पासून मुरबाड तालुक्यात प्रामुख्याने आरोग्य आणि शैक्षणिक कार्यात समाजपयोगी उपक्रम राबवित आहे. आमदार किसन कथोरे यांच्या विनंतीनुसार सुरू झालेले हे कार्य नियमितपणे सुरू आहे. स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील शिरवली, तोंडली, मानिवली पाडा, मानिवली, वडाची वाडी, तळ्याची वाडी, चिल्लार वाडी, खोंड्याची वाडी, रावगांव, काकडपाडा, व्हावे, सासणे, खोकाटे वाडी, टेपवाडी, काचकोली, चिमणीची वाडी, मोहघर, खामघर, वेहेरे आणि देवराळ वाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी फाऊंडेशनच्या माध्यमातून शालेय साहित्य भेट म्हणून दिले जाते. या व्यतिरिक्त आरोग्य शिबिरे भरविणे, शाळा, इमारतींची डागडुजी आदी उपक्रम स्पंदन फाऊंडेशन करते. ‘स्पंदन’च्या वतीने मुरबाडमधील शेकडो महिलांना पाणी सुलभपणे वाहून आणण्यासाठी वॉटरव्हिल्सही देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी स्पंदन फाऊंडेशनने गरजू मुलींच्या शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे. या अंतर्गत संस्थेने २६३ विद्यार्थीनींचे शैक्षणिक शुल्क भरले आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK