आमदार किसन कथोरे साहेबांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे विविध शासकीय योजना अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मुरबाड मतदार संघात सुरू आहेतच, शिवाय काही स्वयंसेवी संस्थाही या मतदार संघात विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. रोटरी, लायन्स क्लब, वसुंधरा संजीवनी मंडळ, नाम फाऊंडेशन आदी संस्था गेली काही वर्षे मुरबाडमध्ये विविध ठिकाणी जलसंधारण प्रकल्प राबवित आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. या सर्व स्वयंसेवी संस्थांना आमदार कथोरे साहेबांचे सदैव सहकार्य असते. ‘वसुंधरा’ने गेल्या काही वर्षात मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ५९ तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे २९ कोटी लिटर्स अतिरिक्त पाणी ग्रामीण भागात उपलब्ध झाले आहे.