VIKASPARV 5.0

Menu
Logo

कल्याण तालुक्यातील विविध विकास प्रकल्प आणि सुविधा केंद्र

गोवेली, म्हसा येथे लॉ कॉलेज कल्याण तालुक्यातील गोवेली आणि मुरबाड तालुक्यातील म्हसा इथे लॉ कॉलेज मंजूर करण्यात आली असून कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यामुळे सोय झाली आहे. जीवन शिक्षण मंडळ संचलित म्हसा येथील लॉ कॉलेजला सौ. कमलताई किसन कथोरे यांचे नाव देण्यात आले आहे. 

उप आरोग्य केंद्रः कल्याण तालुक्यातील कुंदे, जांभूळ आणि दहिवली इथे स्थानिक नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उप आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

मामणोली येथे भात खरेदी केंद्र सुविधा : कल्याण तालुक्यात भात खरेदी केंद्र नसल्यमुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून आर्थिक पिळवणूक होत होती. आमदार किसन कथोरे यांनी ही उणीव लक्षात घेऊन कल्याण तालुक्यात मामणोली येथे पहिले भात खरेदी केंद्र सुरु केले. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला. 

गोवेली ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष : गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची सोय झाली आहे. या ठिकाणी शस्त्रक्रिया विभागासह अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. कल्याण तालुक्यात १६ तलाठी कार्यालये मंजूर कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी १६ तलाठी कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात अधिक चांगल्या पध्दतीने काम करता येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK