VIKASPARV 5.0

Menu
Logo

भोज-कोंडेश्वरच्या सौदर्याला सुविधांचे कोंदण !

बदलापूर परिसराला निसर्ग सौंदर्याची देणगी लाभली आहे. त्यामुळे शहराबाहेर पडताच निसर्गरम्य परिसर दिसतो. बदलापूर पश्चिमेकडचा भोज कोंडेश्वर परिसर म्हणजे या भागातील उत्तम हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथील सौदर्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. या परिसराला ऑक्सिजन व्हॅली असेही म्हणतात. अंतरा अंतराने असलेल्या आदिवासी वाड्या ओलांडत, नागमोडी वाट आपल्याला भोज धरण आणि तिथून पुढे कोंडेश्वर मंदिरापाशी आणून सोडते. बारमाही वाहणाऱ्या जलस्त्रोतालगत असलेल्या या मंदिरात प्रवेश करताच खूप प्रसन्न वाटते. त्यामुळे खूप दूरवरून भाविक या महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी येतात. अप्रतिम निसर्गाची सैर घडविणाऱ्या या पायवाटेचा आता छान रस्ता झाला आहे. या भागात नवे पूल बांधण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या गरजेनुसार आमदार किसन कथोरे या भागात सुविधा पुरवित असतात. याच परिसरात असलेल्या भोज धरणाच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK