VIKASPARV 5.0

Menu
Logo

माळशेज घाट पर्यटकांचं ड्रीम डेस्टीनेशन

पश्चिम घाट पर्वतरांगेतील मनमोहक हिल स्टेशन म्हणजे माळशेज घाट… जैव विविधता, हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये वसलेले धबधबे यामुळे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर माळशेज घाटाकडे वळतात. याच माळशेज घाटात चीनमधील काचेच्या व्हिविंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.

राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा व्हिविंग गॅलरीचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. भारतातील हा पहिला प्रकल्प असेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. या गॅलरीमुळे माळशेज घाट परिसराच्या जादुई दुनियेचा आनंद द्विगुणित होईल. इथल्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. त्याचा फायदा रोजगार निर्मितीसाठी होईल.

माळशेज घाटाच्या खोल दरीमध्ये काचेचा स्कायवॉक उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने देखील मंजूर केला असून त्याला आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. या काचेच्या स्काय वॉक मुळे माळशेज घाट हे पर्यटनाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठीच पथदर्शी प्रकल्प असल्याने भविष्यात राज्यातील इतर पर्यटन स्थळांवरही असा प्रकल्प उपयुक्त ठरेल. माळशेज घाटाचं आणि पर्यायानं राज्याचं पर्यटन वाढलं तर देशाच्या तिजोरीत परकीय गंगाजळी वाढून विकासाला आणखी चांगल्या पद्धतीने गती मिळेल.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK