अयोध्येत ज्या दिवशी श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन झाले, त्यादिवशी बदलापूरमध्ये कुळगांव गांधी चौकातील श्रीराम महोत्सव स्थळ ते उल्हास नदीपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो बदलापूरकर नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. उल्हास नदीकिनारी चौपाटीवर भाविकांचा जनसागर लोटला होता. त्यांच्या साक्षीने अतिशय भव्य प्रमाणात गंगाआरती करण्यात आली. त्यावेळी बदलापूरमध्ये जणू काही वाराणसी अवतरली होती. यादिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.