बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेतच, शिवाय पोलिसांसाठी वसाहतीचीही आवश्यकता आहे. या दोन्ही इमारतींचं नूतनीकरण आणि कर्मचारी वसाहतींसाठी निधी मंजूर व्हावा, यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना यासंदर्भात आमदारांनी निवेदन दिले आहे. बदलापूरच्या दोन्ही पोलीस स्टेशनचे नूतनीकरण आणि वसाहतीविषयी मुंबई पोलीस गृहनिर्माण मंडळाकडे फडणवीस साहेबांनी शिफारस करावी, अशी विनंती आमदारांनी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस स्टेशनलगत पुरेशी जागाही उपलब्ध आहे. फडणवीस साहेबांसोबत वेळोवेळी होणाऱ्या बैठकांदरम्यान आमदार कथोरे या योजनेचा पाठपुरावा करीत आहेत. ‘लवकरच हा प्रकल्प मार्गी लागून बदलापूर शहरातील दोन्ही पोलीस स्थानकांचा कायापालट होईल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.