मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या खोल दरीमध्ये तब्बल एक हजार फूट लांबीचा तिरंगा आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने फडकवण्यात आल्याने नवा विक्रम नोंदवण्यात आला. माळशेज घाटात दोन हजार फूट खोल दरीत तब्बल एक हजार फूट लांबीचा भव्य तिरंगा फडकवण्यात आला. सह्मगिरी या संस्थेच्या ट्रेकर्स ग्रुपच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. घाटाच्या या खोल दरीमध्ये तब्बल एक हजार फूट लांबीचा तिरंगा फडकवल्याने या अनोख्या उपक्रमाची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रंगली..