Phone
+91 9422073551Address
Kasturi Niwas, Chatrapati Sambhaji Nagar, Murabad, Maharashtra 421401© Alrights reserved
by MLA Shri Kisan Kathore
महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांपैकी कोकणातील सर्वात मोठी नदी म्हणजे ‘उल्हास’. सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये उगम पावणारी उल्हास नदी सुमारे १४० किलोमिटर प्रवास करून अरबी समुद्राला मिळते. या खोऱ्याचे विस्तार क्षेत्र ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणपणे ४ हजार ५०० चौ. किमी. आहे. आमदार किसन कथोरे नदी संवर्धन प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आग्रही असून संबंधित विभागात त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.उल्हास नदीचं उगमस्थान लोणावळ्याशेजारच्या परिसरात असून पुढे बदलापूर जवळ बारवी-मुरबाडी या नद्यांचा प्रवाह तिला येऊन मिळतो.टाटा कंपनीव्या पुणे जिल्ह्यातील आंद्रा धरणातील पाणी भिवपुरी जलविद्युत केंद्रात वापरून पुढे ते उल्हास नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे बारमाही प्रवाही असणारी उल्हास नदी आणि बारवी धरणातील जलसाठ्यांमधून सध्या ठाणे जिल्ह्यातील शहरे, काही प्रमाणात ग्रामीण भाग आणि औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा होतो.त्यादृष्टीने उल्हास नदीचे महत्व लक्षात घेऊन नदी संवर्धन प्रकल्प प्रस्तावीत आहे. त्याचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला असून अंदाजे ७८३ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या नदी संवर्धन प्रकल्पात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नदीकाठी होणारी वाढती अतिक्रमणे रोखणे, पात्रातील प्रदुषण कमी करणे आणि नागरिकांना शुद्ध तसेच चांगल्या दर्जाचा पाणी पुरवठा करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर नागरिकांना फिरण्यासाठी उद्याने, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधांचाही त्यात समावेश आहे
Website and App developed by WE-cts
© 2024 | All rights reserved by Shri. Kisan Kathore