VIKASPARV 5.0

Menu
Logo

मतदार संघात सुसज्ज रुग्णालये

१५० बेडचे मुरबाड ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे सुरू करण्यात आलेल्या मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आजच्या घडीला १०० बेडचे रुग्णालय असून त्या ठिकाणी आता १५० बेडच्या रुग्णालयाला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे या रुग्णालयाचे विस्तारीकरणाचे काम लवकर सुरू केले जाणार आहेत या सोबतच रुग्णांची क्षमता वाढवली जात असतानाच त्या ठिकाणी आता वाढीव डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.

१०० बेडचे टोकावडे रुग्णालय संपूर्ण मुरबाड तालुक्याची वैद्यकीय सुविधा ही मुरबाड ग्रामीण रुग्णालय आणि टोकावडे रुग्णालयावर अवलंबून आहे या ठिकाणी आणखीन चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोकावडे येथील ५० बेडच्या रुग्णालयाला १०० बेडच्या रुग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. मुरबाड मधील ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला या रुग्णालयाचा लाभ होणार आहे.

५० बेडचे गोवेली रुग्णालय कल्याण तालुक्यातील गोवेली रुग्णालयाची क्षमता वाढवून त्याठिकाणी ५० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK