मुरबाड मतदार संघात गाव तिथे व्यायाम शाळा उभारण्याचा निर्णय आमदार किसन कथोरे यांनी घेतला आहे. शासनाच्या निधीतून प्रत्येक गावात सर्व सुविधांनीयुक्त अशा व्यायाम शाळा उभारण्याची कामे सुरू आहेत. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होत असताना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा पुरवण्याकडे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गावात व्यायाम शाळा उभारण्याबाबत योग्य निर्णय घेतले जात आहेत त्याचा लाभ ग्रामस्थांना होत आहे.गेल्या पाच वर्षात आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील ८० ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये निधी हा व्यायाम शाळा उभारण्यासाठी देण्यात आला आहे. प्रत्येक गावाला सात लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे.