VIKASPARV 5.0

Menu
Logo

आदिवासी भागासाठी 'हेल्थ ऑन व्हील' !

मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार किसन कथोरे साहेब नेहमीच प्रयत्न करीत असतात, विविध उपक्रम राबवीत असतात. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण करणे, अत्याधुनिक उपचार साधने आणि आरोग्य सुविधा पुरवणे आदी सुविधा त्यांनी राबवल्या. परंतु तरीही गावपाड्यांवरील आदिवासी रुग्णालयात येत नसल्याने आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात, हे आमदार साहेबांच्या लक्षात आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून त्यांनी मुरबाडमधील दुर्गम भागात राहणाया कातकरी आणि ठाकुर आदिवासींच्या सोयीसाठी हेल्थ ऑन व्हिल अर्थात मोबाईल रुग्णालय सेवा कार्यान्वीत केली आहे. मुरबाड तालुक्यासाठी या योजनेतून तीन मोबाईल हॉस्पिटल्स मंजूर आहेत. नियमित वेळापत्रकानुसार ती वाहने गावपाड्यांमध्ये जाऊन स्थानिकांची तपासणी, उपचार आणि प्राथमिक स्वरूपाची औषधे देतात. एखाद्या गंभीर आजाराचा रुग्ण आढळून आल्यास त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले जातात.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK