VIKASPARV 5.0

Menu
Logo

जांभूळ गाव होणार जांभळाचे गाव

कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे. गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी येथील जांभळाची झाडे कमी झाली होती. त्यामुळे गावाची मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने तयारी सुरू केली असून कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून १० हेक्टर जागेवर आता १० हजार जांभळांची झाडे लावली जाणार आहेत. या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. १० हेक्टर जागेवर १० हजार जांभळांची आणि तीन हेक्टर जागेवर ३ हजार ३०० बांबूची लागवडही केली जाणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सोबत घेऊन आमदार किसन कथोरे यांनी देखील अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा फायदा थेट त्या गावांना आणि त्या गावातील ग्रामस्थांना होत आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK