मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ धसई जिल्हा परिषद गटातील मिल्हे येथील ग्रामस्थांची आज भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत गावखेड्यांच्या वेगवान विकासासाठी मुरबाड मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ या निशाणी समोरील बटन दाबून तुमच्या हक्काच्या या लोकसेवेकाला बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले. सलग तीनदा आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून आपली सेवा करण्याची संधी दिली. यावेळी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तुम्हा सर्व मायबाप जनतेची मला साथ हवी आहे आणि ती द्याल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.
#Kisankathore #Bjp4maharashtra