VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमध्ये विक्रमी विजयासाठी गाव संवाद दौऱ्याचा जोर

मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ गाव संवाद दौरा मतदारसंघात सुरू आहे. सरळगांव जिल्हापरिषद गटातील वडवली, भादाणे, संगम, आस्कोत, कासगांव, उमरोली, इंदे, आनंदवाडी, साजगांव, आंबेळे खु, खुटल, नांदगांव आणि मानिवली या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांचा मिळणारा पाठिंबा विजयाची विक्रमी मोहोर उमटवेल ,असा विश्वास दर्शवत होता. येणारी निवडणूक विकासाची एक दृष्टी निर्माण करणारी आहे. याकरिता भरघोस मताधिक्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करा, असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी गावातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK