माझ्या वाढदिवसानिमित्त श्री. मनोज देसले व मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. मानसी देसले यांच्या वतीने माऊली गार्डन हॉल, मुरबाड येथे शिक्षक सन्मान सोहळा व स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित महिला आणि शिक्षकांशी संवाद साधत त्यांचं महत्त्व व योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी विशेष व्याख्यान दिलं, ज्यामुळे उपस्थितांना जीवनातील विविध पैलूंवर नवीन दृष्टिकोन मिळाला. शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत त्यांनी मूल्यवान विचार मांडले.