VIKASPARV 5.0

Menu
Logo

एक हात मदतीचा: मेंगळ कुटुंबास मदतीचा धनादेश

माझ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मौजे भांगवाडी येथील ग्रामस्थ कै. रुक्मिणी गोपाळ मेंगळ यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना चार दिवसांपूर्वी घडली. या घटना ने सर्व कुटुंबावर आभाळ कोसळण्यासारखी परिस्थिती निर्माण केली. सोमवारी मी मेंगळ कुटुंबियांना भेट दिली आणि त्यांना सांत्वन करत, चार लाख रूपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

आजकाल नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे, खासकरून भौगोलिक समतोल ढासळल्यामुळे अशा घटना अनेकदा घडत आहेत. पावसाळ्यात विशेषत: झाडाखाली किंवा आडोशाला थांबताना सुरक्षिततेचा खबरदारी घेणे आवश्यक आहे. या प्रकारच्या आपत्तींचे आपल्यावर नियंत्रण नाही, पण काळजी घेतल्यास मोठ्या संकटांपासून वाचता येऊ शकते.

माझ्या भेटीवेळी, तहसीलदार अभिजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गिविंद भल्ला, नितीन मोहपे सर, दीपक पवार, अनिल वायले आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कुटुंबीयांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले गेले.

साहेबांचे विकासकार्य Share करा ..!

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK