VIKASPARV 5.0

Menu
Logo

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी दृढ पाठिंबा: एकत्रित विकासासाठी एकजुटीचे आवाहन!

जय सेवालाल..!! बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बदलापूर पश्चिमेतील अजय राजा हॉल येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून समाजातील नागरिकांशी संवाद साधला. शांत आणि मेहनती असलेला बंजारा समाज माझ्या मतदारसंघात गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहतो. त्यांच्या विविध मागण्यांसाठी मी पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. विधानसभा निवडणुका झाल्यावर बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावणार, असा शब्द यावेळी दिला. समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले. आपल्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबरला एक नंबरच्या ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK