VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडच्या विकासाचा विश्वास: गाव भेट दौऱ्यातून गावकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद!

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बदलापूर ग्रामीण भागातील गावांमध्ये गाव भेट संवाद दौरा गावकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी चामटोली, दहीवली, वराडे, सावरोली, भोज, धामनवाडी, तारवाडी, बेंडशील, चीकनेची वाडी, चाफेवाडी, चिंचवली वाडी, कोपऱ्याचीवाडी, तान, कासगाव वाडी, कासगाव, गोरेगाव, ढवले गाव, वांगणी, डोने, कुडसावरे वाडी, कुडसावरे, ढवलेपाडा, सावरे, देवलोली आणि जांभाळा या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. दिवसभर या भेटी दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे माझ्या तळागाळातील गावकऱ्यांना विकासावर विश्वास आहे. आतापर्यंत केलेल्या विकासकामांची ही पोचपावती आहे. याआधीचा आणि माझ्या कार्यकाळातला गाव खेड्यांचा विकास यामधील साम्य प्रत्येक गांवकरी ओळखून आहेत. त्यामुळे मायबाप जनतेचा प्रचंड पाठिंबा लाभत आहे. येत्या २० नोव्हेंबरला मुरबाड विधानसभेवर 'कमळ' फुलवण्यासाठी आता मतदारसंघातील खुद्द महिला, ज्येष्ठ आणि तरुणाई सज्ज झाली आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती राहून गावकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभार मानतो.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK