रविवारी बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रमेशवाडी येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत प्रचार फेरी स्थानिक जनतेच्या तुफान प्रतिसादात पार पडली. प्रत्येक ठिकाणी माता भगिनींनी, स्थानिक युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. मुरबाड विधानसभेवर पुन्हा ‘कमळ’ फुलवून मोठ्या विजयासाठी मायबाप जनतेचे भरभरून आशीर्वाद लाभले. विश्वासाच्या या भरघोस पाठिंब्याने विजय आपलाच आहे, हे अधोरेखित झाले.
या प्रचारफेरीला उस्फुर्त प्रतिसाद देणारे स्थानिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार..!

